आरोग्य
समाजातील दीनदुबळ्यांच्या आरोग्यासाठी संजीवनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून, तसेच श्री. विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवेत मोफत फिरता दवाखाना, मोफत रुग्णवाहिका सेवा, रक्तदान शिबीर, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, सर्वरोग निदान शिबीर आदी आरोग्य शिबिरांचे करून सेवा हाच धर्म जपत आहे.
रोजगार
वाढत्या शैक्षणिक सुविधा यामुळे आज मोठ्या प्रमाणात शिक्षित तरुण हा समाजामध्ये वावरतो त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी कॉल सेंटर, औद्योगिक वसाहतीत रोजगार निर्माण करून दिला जात आहे. तसेच शासन स्थरावर प्रयत्न करून औद्योगिक महामंडळ आण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
शैक्षणिक
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुणे मुंबई सारख्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी सहकार महर्षी शंकरावजी कोल्हे साहेब यांच्या विचारातून संजीवनी शैक्षणिक संकुलाची निर्मिती करून शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देत , दर वर्षी हजारो विद्यार्थ्यांना कॅम्पेस इंटरव्हिव च्या माध्यमातून नौकऱ्या मिळत आहे. त्याचप्रमाणे कार्यशाळा, व्याख्यानं, चर्चा सत्र आणि मोफत शालेय साहित्याचे वाटप करून शिक्षणाला प्रोत्साहन दिले जाते.
आपत्ती व्यवस्थापन
निसर्गाच्या कोपाचा उद्रेकानंतर त्या भागात मदत कार्य संजीवनी युवा प्रतिष्ठाणच्या माध्यामातून उभे केले जात असते. त्यामध्ये गुजरातमधील भुज, महाराष्ट्रातील किल्लारी गावात झालेला भूकंप तसेच कोल्हापूर व चिपळूण येथे पूरग्रस्तांना मदत कार्य केले आहे.
कोविड-१९
कोरोना महामारीमध्ये हजारो रुग्णाना जीवनदान देण्यासाठी ५०० खाटांचे व ५० अतिदक्षता विभाग सुरू करून मोफत कोव्हिडं डेडीकेट हेल्थ केअर सेंटर सुरू केले होते. या सेवेत रुग्णाना मोफत औषधोपचार, सॅनिटायझर, मास्क, रुग्णवाहिका आदी सेवा पुरविण्यात आल्या.
सामाजिक
हजारो गरीब कुटुंबाच्या मुला-मुलींनीचे थाटामाटात सर्व धर्मिय सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करून त्यांचे संसार उभे केले. यामध्ये नववधू-वरांना संसारपयोगी साहित्य, कन्यादान, शास्रोक्त पद्धतीने विवाह, थाटामाटात सोहळा साजरा केला जातो.
विवेक कोल्हे बद्दल
विवेक कोल्हे यांनी सामाजिक आणि राजकीय क्षितीजावर सहकार, शिक्षण, औद्योगिक, युवा, पर्यावरण, आरोग्य, आदी क्षेत्रात फार थोड्याच दिवसात आपला एक वेगळा ठसा उमटविला आहे. जो प्रत्येकाला नव्या सामाजिक कार्याची प्रेरणा देणारा आहे. यासाठी त्यांच्याकडे सहकार महर्षी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या ‘सेवा हाच धर्म’ विचारांचा ठेवा असून वडील संजीवनी उद्योग समुहाचे श्री. बिपीनदादा कोल्हे आणि आई कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या प्रथम महिला आमदार मा. सौ. स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली समाज कार्य करत आहे. कोल्हे परीवार कित्येक पिढ्यापासून सामाजिक कार्यात सातत्याने झटत आहे. सामान्य जनतेशी जोडलेले आणि त्यांच्या प्रश्नांची उकल असणारा नेता म्हणून विवेक कोल्हे हे आपल्या कार्याचा ठसा उमटवित आहे.
पुरस्कार
- नवभारत व नवराष्ट्र समूहाच्या वतीने दिला जाणारा "तरुण आश्वासक नेता "
या पुरस्काराने सन्मानित
- विवेकभैय्या कोल्हे यांच्या अभ्यासू कार्यशैलीमुळे नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट,कानपूरच्या
वतीने दखल घेत राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ठ उद्योजकता पुरस्कार उद्योग समूहास प्राप्त झाला.