कोल्हे विवेक बिपीनदादा


 • अध्यक्ष - सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लि.
 •  विश्वस्त - संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्था. (संजीवनी यूनिवर्सिटी)
 • संचालक - इंडियन फार्मर्स फर्टीलायझर को-ऑपरेटिव्ह (IFFCO)
 • संचालक - महाराष्ट्र राज्य सह. साखर कारखाना संघ.
 •  संचालक - अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि.
 • अध्यक्ष - कोपरगाव इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह सोसायटी (इस्टेट) लि.

विवेक कोल्हे बद्दल

तरुणाईला भावणार नेतृत्व आणि प्रचंड दांडगा जनसंपर्क असलेले, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारा नेता, समाज मनावर आपला ठसा उमटवणारा आश्वासक युवा नेता विवेक कोल्हे यांच्या कारकिर्दीची सुरवात तशी विद्यार्थी दशेत झाली. विद्यार्थी चळवळीत असताना महाविद्यालय व्यवस्थापन आणि विद्यार्थी यांच्यामद्धे कायम समन्वयाची भूमिका मांडून त्यांच्या प्रश्नासाठी वेळेप्रसंगी नरमाईने तर कधी आपल्या आक्रमक शैलीने बाजू मांडत न्याय देण्याच्या त्यांचा प्रामाणिक प्रयत्न नेहमी असायचा. के. के. वाघ अभियांत्रिकी महविद्यालयात स्थापत्य विभागात शिक्षण घेत असताना तृतीय आणि चतुर्थ वर्षात जनरल सेक्रेटरी म्हणून निवडून आले. या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी जोरदार आवाज उठवत प्रश्नांना वाचा फोडली. विवेक कोल्हे यांनी प्रथम सामाजिक विकास करण्याचा आणि कोल्हे परिवाराचा सेवा हाच धर्म स्वतामध्ये रुजवायचा यासाठी सामाजिक विकास कामाचा विडा उचलला.

प्रथमच कोपरगाव शहरात पहिले बीपीओ कॉल सेंटर सुरू करून कित्येक तरुणांना रोजगार मिळवून दिला. पुढे ते अ. नगर जिल्हा बँकेत संचालक म्हणून निवडुन आले. ईथेच त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. त्यांच्या कामातील कौशल्य आणि व्यवस्थापन चातुर्य पाहून त्यांना सहकारात नावाजलेला सहकार महर्षि शंकरराव कोल्हे सह. साखर कारखान्यावर चेअरमन केले. अत्यंत संथ गतीने चालणारे सहकार हा वेगात पळाला पाहिजे, म्हणून संगणकीकरण करून नवी दिशा दिली. पुढे विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रातिष्ठानची बीजे रोवली गेली, आणि हजारो तरुण फक्त सामाजिक एकता, आरोग्य, युवा, पर्यावरण, कृषी, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी झटू लागले. आरोग्यसेवेत काम करतांना त्यांनी कोरोना काळात मोफत उपचार देण्यासाठी संजीवनी कोव्हिडं डेडिकेटेड हेल्थ केअर सेंटर सूरु केले. त्यामध्ये शेकडो रुग्णांनी लाभ घेतला. रक्तदान शिबिर, मोफत रुग्णवाहिका सेवा, मोफत फिरता दवाखाना, वृक्षारोपण, गडकिल्ले स्वच्छता करणे, पूरग्रस्तांना मदत, या आदी कामांमुळे त्यांचा राज्यात गवगवा झाला. त्याचप्रमाणे सर्व धर्मिय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाऊ लागले. या माध्यमातून शेकडो गोर गरिबांचे संसार उभे राहिले. कोल्हे साहेबांचा सेवा हाच धर्म हा विचार तेवढ्याच तन्मयतेने ते जपत आहेत आणि वाढवत आहेत.

स्वातंत्रोत्तर कालखंडामध्ये राज्यात अनेक ठिकाणी शैक्षणिक संस्थात्मक बदल होत असताना शिक्षण ही एक सुप्त लाट वाहू लागली. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ही शिक्षणाच्या प्रसार आणि वाढीसाठी प्रयत्न सुरू केले होते. कर्मवीर भाऊराव पाटील महाराष्ट्रात रयत शिक्षण संस्थेचा वृक्ष बहरू लागला होता. त्यांच्या कार्य आदर्शावर स्व. शंकररावजी कोल्हे साहेबांनी रयत शिक्षण संस्थेच्या अनेक ठिकाणी शाळा महविद्यालये सुरू करून टिकवण्यासाठी प्रयत्न केले.  पुढे स्व.कोल्हेसाहेब यांनी अहोरात्र कष्ट करून संजीवनी ग्रामीण एज्युकेशन सोसायटी ही शिक्षण संस्था उभी केली. पुणे, मुंबई सारख्या शहरात मिळणारे शिक्षण ग्रामीण भागात मिळावे. यासाठी कोल्हेसाहेब नेहमी आग्रही होते. या माध्यमातून लाखों विद्यार्थी घडविण्याचे कार्य स्व.कोल्हे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झाले. पुढे हा शैक्षणिक कार्याचा वारसा दुसऱ्या पिढीने सक्षमपणे चालविला. दुसऱ्या पिढीचा हा वारसा पुढे नेत तिसरी पिढी समर्थपणे चालवत आहे. संस्थेचा लौकिक आणि दर्जा पाहून नुकताच ग्रामीण विद्यापीठाचा दर्जा बहाल केला.  गगन भरारीचे वेड हे रक्तात असावं लागतं, तसच समाज सेवेच्या फुकाचा आव आणावा लागत नाही, त्याला बाळकडू तसंच मिळावं लागत. हे बाळकडू स्व. कोल्हेसाहेब व कोल्हे परिवारांकडून मिळाले. विवेक कोल्हे यांच्या आई कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या प्रथम महिला आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे यांचा समाजसेवा व महिला सशक्तीकरणाचे कार्य केलेले आहे. आईच्या संस्काराची आणि समाज सेवेचा पिंड त्यांनी तितक्याच तत्परतेने जपला आहे. म्हणून ते आज मितीस सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सह. साखर कारखान्याचे चेअरमन, जगातील सर्वात मोठी सहकारी संस्थेचे ईफकोचे सर्वात तरुण संचालक, कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन, जिल्हा बँकेचे संचालक, राज्य सहकारी साखर कारखाना संघात सर्वात युवा संचालक म्हणून आदीसह कितीतरी संस्थेवर कामे करत असून त्या संस्था आजमितीस गगनभरारी घेत आहेत. त्यांच्याकडे विकसनशील दूरदृष्टी आहे. सामान्य जनतेशी जोडलेले आणि त्यांच्या प्रश्नांची उकल असणारा नेता म्हणून विवेक कोल्हे हे स्व. कोल्हेसाहेबांचा सामाजिक वारसा जपत आपल्या कार्याचा ठसा उमटवित आहे.

पुरस्कार


 • नवभारत व नवराष्ट्र समूहाच्या वतीने दिला जाणारा "तरुण आश्वासक नेता "
  या पुरस्काराने सन्मानित
 • विवेक कोल्हे यांच्या अभ्यासू कार्यशैलीमुळे नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट,कानपूरच्या
  वतीने दखल घेत राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ठ उद्योजकता पुरस्कार उद्योग समूहास प्राप्त झाला.